Breaking News

पालेखुर्द येथील जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राची मराठी संस्कृती अत्यंत समृद्ध आणि महान असून ती जपणे तसेच पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठी भाषेत शिक्षण घेऊनही आयुष्यात उत्तम यश संपादन करता येते, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पालेखुर्द येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारत उद्घाटन सोहळ्यावेळी केले तसेच ग्रामस्थांना व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
दीपक फर्टिलायझर अँड केमिकल्स कॉर्पोरेशन लि.च्या सीएसआरफ उपक्रमांतर्गत आणि ईशान्य फाउंडेशनच्या सहकार्यातून पालेखुर्द येथील जि.प. शाळेची सुसज्ज नूतन इमारत उभारण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या इमारतीचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तर रायगड जिल्हा भाजप सदस्य तथा माजी नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांच्या पुढाकारातून आणि संयोजनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अत्याधुनिक सुविधांसह प्राथमिक शिक्षण मिळावे या उद्देशाने ही इमारत उभारण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभास आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य आरती काठे, नगरसेवक गणेश कडू, नितेश पाटील, दिनेश खानावकर, नगरसेविका शीला भगत, सरस्वती काथारा, विजयश्री पाटील, संतोष पाटील, नंदू म्हात्रे, महेश पाटील, प्रकाश खैरे, कृष्णा पाटील, शैलेश माळी, शिवाजी दुर्गे, लहू ढोंगरे, अंकुश वाघ, संदीप दाभणे, शशिकांत गोंधळी, नरेश सोनावणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या नूतन शाळा इमारतीमुळे पालेखुर्द परिसरातील शैक्षणिक वाटचालीस अधिक गती मिळणार आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नाट्यसंहितेचे पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‌‘ही परी अस्मानीची‌’ …

Leave a Reply