Breaking News

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध

विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार थेट रक्कम जमा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळा आणि वसतिगृहातून घरी पाठवण्यात आले असले तरी उपस्थितीचा निकष न लावता सरसकट शासन निकषाचे पालन करुन डीबीटीव्दारे आश्रमशाळेतील दुसरा हप्ता व शासकीय वसतिगृह तसेच स्वंयम योजनेचा चौथा हप्ता (माहे मार्च ते मे) रक्कम वर्ग करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन आदिवासी विकास विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मकतेसाठी संपूर्ण देशात 21 दिवसाचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासन निर्देशानुसार सर्व आश्रमशाळा व वसतिगृह बंद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे उपस्थिती नसल्यावर योजनेचा लाभ मिळणार की नाही असा प्रश्न शासकीय आश्रम शाळेतील, शासकीय वसतिगृहातील व स्वयंम योजनेस प्राप्त असणार्‍या  विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र अखेर आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांच्या मनातील ही शंका दूर केली आहे. हलाखीच्या परिस्थीतीत आदिवासी विद्यार्थ्यांना उपस्थितीचा निकष न लावता सरसकट शासन निकषाचे पालन करुन डीबीटीव्दारे आश्रमशाळेतील दुसरा हप्ता व शासकीय वसतिगृह तसेच स्वयम योजनेचा चौथा हप्ता (मार्च ते मे) रक्कम वर्ग करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. शासकीय आश्रमशाळेत 7 हजार 362 विद्यार्थ्यांना सरासरी चार कोटी तसेच शासकीय वसतिगृहामध्ये 35 हजार विद्यार्थ्यांना पंधरा कोटी व स्वयंम योजनेंतर्गत लाभ प्राप्त 7 हजार 500 विद्यार्थ्यांना साडे पाच कोटी अशा प्रकारची विद्यार्थीनिहाय रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे आदिवासी विकास विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सर्व तीनही योजना ऑनलाईन असल्याने कुठल्याही प्रकारची विद्यार्थी दुबार नोंदणी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तरी आदिवासी विकास विभागाने एकुण 49,862 विद्यार्थ्यांच्या बँक खाती डीबीटीद्वारे रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply