आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करार
पनवेल : रामप्रहर वृत्त
शेल एम्प्लॉईज युनियनच्या मार्गदर्शनाखाली शेल इंडिया मार्केट्स प्रा.लि. कंपनीतील कामगारांचा पुढील चार वर्षांसाठीचा ऐतिहासिक वेतन करार पार पडला. सल्लागार तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि.३) या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या नवीन चार वर्षांच्या करारानुसार कामगारांच्या वेतनामध्ये व इतर सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात कामगारांना सरसकट २३ हजार ५०० रुपयांची वेतनवाढ देण्यात आली असून पाच लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स, वार्षिक वाढ अशा सर्व बाबी मिळून एकूण ३१,४०० रुपयांची भरीव वाढ मंजूर करण्यात आली आहे. या करारामुळे कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याआधी कंपनीने कामगारांच्या दिवाळी बोनससाठी एक लाख २५ हजार रुपयांचा करार संघटनेसोबत केला आहे.
या करारावेळी शेल इंडिया एम्प्लॉईज युनियन कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष जितेंद्र घरत, रामदास गोंधळी, सुनील पाटील, यासिन शेख, जयराज जाधव, अनिल पावशे, सुनील हरिचंद्रकर तसेच कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने गुलशन चौधरी, उत्त्पल कुमार, शशांक शेखर, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper