उरण : बातमीदार
मास वर्ल्ड फाऊंडेशनतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या युवा व युवतींना राष्ट्रीय मॉनिटरी अॅवॉर्ड देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते. या वर्षी भारतामधील 200 जणांना हे अवार्ड देण्यात आले यामध्ये क्रीडा क्षेत्रात उलेखनिय कामगिरी केलेल्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना दिल्ली येथे मोनिटरी राष्ट्रीय अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हे अॅवॉर्ड प्रीतमपुरा येथे क्रीम्स अॅडोटोरियम येथे देण्यात आले. या वेळी दिल्लीचे कमिशनर आमन राजपूत, आर एस शर्मा (ऑलम्पिक संघटना अध्यक्ष), आर के शर्मा (दिल्ली रेल्वे कमांडर), राजेश तिवारी (मासा संघटना अध्यक्ष) आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. गोपाळ म्हात्रे हे आंतरराष्ट्रीय कराटेपटू असून कराटेचे उत्तम शिक्षक देखील आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी कराटे क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गोपाळ म्हात्रे यांना मॉनिटरी राष्ट्रीय अॅवॉर्ड हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.