Breaking News

उरण येथे ईद उत्साहात साजरी

उरण : वार्ताहर

ईद हा मुस्लीम धर्मातील महत्त्वाचा सण आज बुधवार (दि. 5) रोजी रमजान ईद असल्याने उरण शहरात ठिकठिकाणी सुमारे चार हजार चारशे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केला. नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उरण पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अतुल आहेर, पोलीस अधिकारी शहनाज मुकादम, तारिक भाईजी, डॉ. नौमान तुंगेकर, समदमुल्ला, नईम, गुलजार भाटकर, तबरेज शेख, अदीब भाईजी, असिम सोंडे व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply