महाड ः अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड संस्थेतर्फे गुरुवारी (दि. 6) तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने महाड येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारखेप्रमाणे 6 जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून शिवभक्तांनी सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे येणार्या शिवभक्तांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत आहे. यंदाही सोहळ्यासाठी अलोट जनसागर लोटणार असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक या सोहळ्याचे नियोजन करण्यात आल्याचे सदस्यांनी सांगितले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …