खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 17) माहिती व तंत्रज्ञान विभाग व बिके एक्सेल नेटवर्क खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी टेक्निकल ट्रेनर बिरू कोळेकर प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट लिखित स्वरूपात एमओयूमधून दोन्ही संस्थेच्या ज्ञान व संसाधनांमध्ये आवश्यक योगदान देण्याची हमी देऊन करार हस्तांक्षरित करण्यात आला. या एमओयूमधून महाविद्यालयाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना एमएस वर्ड, एमएस पावर पॉइंट, एमएस एक्सेल, एम एस ऍडव्हान्स एक्सेल, डॅश बोर्ड, गुगल शीट्स, गुगल डेटा, टॅली प्राइम, टॅली प्राइम, टॅक्सेशन या सर्व तंत्रज्ञानावरती वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्रॅम व विविध कोर्सेस घेण्यात येतील अशी हमी दिली.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड, प्रा. महेश्वरी झिरपे अंतर्गत गुणवत्ता सिद्धताकक्ष समन्वयक, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. रश्मी पाटील तसेच प्रा. महेश धायगुडे, प्रा. मीनल मांडवे, प्रा. स्नेहा लोखंडे हे उपस्थित होते.