रसायनी : प्रतिनिधी
लाडीवली येथील लोना कंपनीसमोर लाडीवली येथील लोनामध्ये काम करणारे ऑफीसर हे त्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला नुकतेच बसले आहेत. यामध्ये नयन वसंत गोळे, सुरेश भाऊ शिगवण, मनोहर गणेश शिर्के, सागर सदाशिव कालेकर, तुषार गोविंद कालेकर हे आहेत हे सर्व लोनामध्ये काम करीत असून त्यातील दोघे कायम झालेले आहेत. समान पगार मिळाला पाहिजे, आमचे पगार हे वाढवले पाहिजेत, आमचे प्रोबशन पिरियड जास्तीत आहे व ट्रेनिंग पिरियड जास्तच आहे तो कमी करा, अशा मागण्या या कामगारांनी केल्या आहेत. कंपनी व्यवस्थापनाला लाडवली ग्रामस्थांनी मदत केली आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे. या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात आले आहे की, आम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही. उपोषणाला बसलेले दोन नयन वसंत गोळे व सुरेश भाऊ शिगवण यांनी कंपनीच्या ऑफीसर असलेले प्रभाकर दळवी यांना मारहाण केली आहे व कंपनीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनीत समान वेतन हा कायदा मान्य होत नाही. येथे कामाचा अनुभव लक्षात घेतला जातो. कंपनीच्या स्टाफमध्ये असलेले युनियन करू शकत नाही हा नियम आहे. जे कंपनीच्या कामाची शिस्त व नियमानुसार वागत नाहीत व कंपनीचे चांगले वातावरण खराब करतील व वरीष्ठ अधिकारी याचे काम व नियम पाळत नाहीत त्यांना कंपनीच्या नियमानुसार शिक्षाही होणार. कंपनीमध्ये जागतिक मंदीचे सावट आहे. यामुळे कंपनी संकटातून जात आहे, असे असताना हे लोक जाणूनबुजून कंपनीचे नाव खराब करीत आहेत. आता जे उपोषणाला बसलेले दोघे याचे वेतन चांगले आहे व बाकीचे शिकत शिकत काम करतात असे म्हणत व्यवस्थापनाने त्याचे आरोप फेटाळले आहेत.