Breaking News

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

पनवेल: प्रतिनिधी

जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या संबंधित शाळाचालकांनी  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नये, तसेच पालकांनी अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले आहे.

अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळांमधून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालकच जबाबदार राहतील, याची पालकांनी नोंद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अनधिकृत शाळा अलिबाग तालुक्यात एक, पनवेलमध्ये 10,  रोह्यात दोन, म्हसळा तालुक्यात 4, कर्जत तालुक्यात दोन, मुरुड तालुक्यात 2 आहेत.

जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी

अलिबाग तालुक्यातील मदर केअर एज्यु.सो.किंडर ड्रिम्स प्री-स्कूल, नागाव अलिबाग,  पनवेल तालुक्यातील आनंदी दिनकर कोळी शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई, आरोसे इंटरनॅशनल स्कूल वहाळ,  लेट चांगूनाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसायटी वहाळ, पराशक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल कोपर गव्हाण, होली स्पिरीट इंग्लिश मिडीयम स्कूल आपटा,  वेदांत पब्लिक स्कूल कंळबोली, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.सी.), गिरीराज सिंग सोलंकी पब्लिक स्कूल लोणीवली, शारदादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल आदई,सुकापूर, कळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल तळोजे,पाचनंद,  रोहा तालुक्यातील रायगड

एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल खुटल.  ज्ञानाकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब,   म्हसळा तालुक्यातील इकरा इस्लामिक स्कूल मकतब,  न्यू इंग्लिश स्कूल लिपणी वावे ऊर्दू,  अल इशान इंग्लिश स्कूल म्हसळा,  सुरेश ग. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल म्हसळा,  कर्जत तालुक्यातील कृष्णा सेवाभावी सामाजिक संस्था कर्जत,  होली ट्रीनीटी फाऊंडेशन, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल,वेगांव रोड दहिवली कर्जत,   मुरुड तालुक्यातील रॉयल एज्यु.सो.डॉ.ए.आ.उन्ड्रे इंग्लिश मिडीयम स्कूल बोर्ली-मांडला मुरुङ  अंजुमन इस्लाम जंजिरा प्री-प्रायमरी स्कूल,पंचक्रोशी मुरुड.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply