Breaking News

स्वच्छता अभियानात सक्रियतेने सहभागी व्हा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी

 आपल्या पुढाकाराने पनवेल महापालिका हद्दीतील परिसर स्वच्छ होणार आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वच्छता महाभियानात सक्रियतेने सहभागी व्हावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 10 जूनपर्यंत पनवेल महापालिका हद्दीत स्वच्छता महाभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेवर विशेष भर देत त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम चालू असताना हातभार लावा, असे आवाहन  आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले स्वच्छता महाअभियान यशस्वी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेतील सर्व नागरिकांनी व  कार्यकर्त्यांनी आपला परिसर, आपला विभाग स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी या अभियानात सहभागी व्हा, आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले.

‘मल्हार रोजगार मेळावा’ 8 जून रोजी

पनवेलमध्ये 15 वा ‘मल्हार रोजगार मेळावा’ येत्या शनिवारी 8 जून 2019 रोजी सकाळी 9.30 ते 4.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुमारे 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

बेरोजगारांचे प्रश्न सुटावेत आणि त्यांना सहजपणे नोकरी उपलब्ध व्हावी यासाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि रोजगार मेळाव्याला भेट द्यावी. या 100 कंपन्या या मेळाव्यात सामील होत असल्यामुळे हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आपल्याला आशा वाटते, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …

Leave a Reply