खरघर : रामप्रहर वृत्त : महेश्वरी महिला मंडळ खारघर व भारतीय जनता पार्टी खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 12 येथील गोखले शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी ‘मॅन्युअल सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’ बसविण्यात आले. या मशीनचे उद्घाटन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती (अ) सभापती शत्रुघ्न काकडे व नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनोरमा महेश्वरी, उपाध्यक्षा ऊर्मिला बावरा, जयश्री मुंदडा, सचिव साधना गुप्ता व सुनीता सोमानी, मंडळाचे अध्यक्ष मदन जी. महेश्वरी सचिव वेंकटेश बावरी, राम दाल, निलू बजाज, अपर्णा बावरा, स्थानिक नगरसेवक रामजीभाई गेला बेरा, सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, व्यापारी सेल अध्यक्ष अंबालाल पटेल, सोशल मीडिया संयोजक विनय पाटील, अशोक पवार, अमर उपाध्याय, मधुमिता, शामला मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक नरेश पाटील, शिक्षक वर्ग व दहावीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी मशीनचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक व माहिती देण्यात आली. महेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की, आतापर्यंत 1551 मशीन लावण्यात आलेले आहेत व ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये लवकरच नोंद होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत मनोरमा महेश्वरी, तर प्रास्ताविक सरचिटणीस गीता चौधरी व ऊर्मिला पावरा यांनी केले. सर्वांचे आभार साधना गुप्ता यांनी मानले व मशीनचे प्रात्यक्षिक जयश्री मुंदडा यांनी दाखविले.