Friday , March 24 2023
Breaking News

विराट कोहलीने गाठला पाच हजार धावांचा टप्पा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत काढलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या बाराव्या हंगामात एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराटने ही कामगिरी केली. याआधी, बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या सुरेश रैनाने सर्वात पहिल्यांदा पाच हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराटलाही ही कामगिरी प्रथम करण्याची संधी होती, मात्र यासाठी आवश्यक असलेल्या 52 धावा तो करू शकला नाही. पहिल्या सामन्यात तो अवघ्या 6 धावांवर माघारी परला होता.  त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात या यादीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी विराटला 46 धावांची गरज होती. या धावा त्याने केल्या.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply