पोलादपुर : प्रतिनिधी
दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार्या पोलादपुर तालुक्यातील दहा गावांना टँकरद्वारे मिळालेले पाणी साठविण्यासाठी भाजपतर्फे साठवण टाक्या देवून आमदार प्रवीण दरेकर यांनी तेथील ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.
पोलादपुर तालुक्यातील पाणीटंचाईप्रश्नी आमदार प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपुर्वी आढावा घेतला होता. त्यावेळी टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येते, मात्र तेथे ते पाणी साठविण्याची सुविधा नसल्याचे आमदार दरेकर यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी टंचाईग्रस्त गावांना पाणी साठवण टाक्या देण्याचे आश्वासन दिले होते.
आमदार दरेकर यांनी गेल्या आठवड्यात भाजपतर्फे पोलादपूर तालुक्यातील कोंढवी, देवपूर, कातळी, पार्ले आणि कुडपण या पाच गावांना प्रत्येकी एक याप्रमाणे 5 हजार लिटर्स साठवण क्षमतेची टाकी प्रदान केली. त्यानंतर अन्य टंचाईग्रस्त ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार आमदार प्रवीण दरेकर यांनी पुन्हा शेलारांचे कुडपण, दिवील, कोतवाल खुर्द, नाणेघोळ, चांभारगणी या गावांसाठी प्रत्येकी 5 हजार लिटर्सच्या टाक्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या हस्ते दिल्या.
भाजप पोलादपुर शहर अध्यक्ष नितीन घोलसाळकर, समाजसेवक प्रसन्ना पालांडे, राजन धुमाळ, एकनाथ कासुर्डे, समीर सुतार, नामदेव शिंदे, गोपाळ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या साठवण टाकी प्रदान कार्यक्रमाला काशिनाथ शेलार, हनुमंत शेलार, राम शेलार, महादेव शेलार, गणपत मोरे, जावजी चिकणे (शेलारांचे कुडपण), मंगेश जंगम, मारुती चव्हाण, कृष्णा मोरे, चंद्रकांत जाधव, विठ्ठल भिल्लारे, सदाशिव चव्हाण, दगडू शिंदे (दिविल), उत्तम शिंदे, विठ्ठल शिंदे ,रामचंद्र जाधव, भाऊनाथ जाधव, निलेश उतेकर (कोतवाल खुर्द), संजय मोदी, शांताराम जंगम, सुरेश जंगम, बबन अहिरे, मारुती धनावडे, दत्ताराम जंगम (नानेघोळ) तसेच चांभारगणीचे सरपंच मच्छिंद्र सुकाळे, शांताराम गोळे, संजय सलागरे आणि रमेश शेलार आदी ग्रामस्थ
उपस्थित होते.