Breaking News

रोह्यातील युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

रोहे ः प्रतिनिधी

रोहा शहारासह ग्रामीण भागातील अनेक युवकांनी शुक्रवारी (दि. 20) भाजपचे अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इतर पक्षांपेक्षा भाजपची विचारधारा वेगळी आहे. भाजप कार्यकर्ता पहिले देशाचे नंतर संघटनेचे आणि त्यानंतर अन्य विचार करतो. येथे संघर्ष करायला लागेल, पण यश निश्चित आहे, असे  अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी सांगितले. सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून  भाजप सरकार काम करीत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना सामान्य घटकांपर्यंत पोहचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी या वेळी केले. रोहा शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत सार्थक जाधव यांच्या नेतृत्वाखाली विक्रम गायकवाड, दिपा गायकवाड, राजश्री पाटील, आदीराज पाटील, नीरज म्हात्रे यांच्यासह बहुसंख्य युवक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. या वेळी भाजपचे नवनीत डोलकर, उत्तम नाईक, निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायत सदस्य वैभव चोरगे, शहर अध्यक्ष शैलेश रावकर, अमरदीप म्हात्रे आदी उपस्थितीत होते.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply