राज्य स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर
पनवेल ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने उलवा नोड येथे झालेल्या रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 9) सायंकाळी संपन्न झाला.
या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, सचिव सुंदर शेट्टी, डी. वाय. पाटील स्टेडियमचे संचालक स्वरूप नाईक, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, सेक्रेटरी डॉ. डेव्हिड अल्वारीस, उपाध्यक्ष रवींद्र भगत, शिवकुमार के. के., खजिनदार नरेंद्र जोशी, सदस्य प्रशांत मुखर्जी यांसह खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील तीन दिवसांच्या स्पर्धेत 450 खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेतून राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाची निवड करण्यात आली. यात पुरुष खुल्या गटातून पीयूष अगरवाल, सिद्धार्थ दास, नितीन, रविंदर कुमार, साईदिनेश रेड्डी, महिला खुल्या गटात गार्गी देगवेकर, अनुष्का पाटील, अलका करायील, प्रीती कुमार, अंतरा थत्ते, 19 वर्षांखालील मुलांच्या गटात साहिल ठाकूर, शैलेश सिंग, विनय राठोड, अनुराग करायील, यशोनील बिंगले, 19 वर्षांखालील मुलींच्या गटात गार्गी देगवेकर, अनुष्का पाटील, पूर्णो रेखी, परिणिता मगदूम, वृस्टी प्रसन्ना, 17 वर्षांखालील मुलांच्या गटात सिद्धार्थ दास, शरण पिल्ले, शैलेश सिंग, अनुराग करायील, विनय राठोड, 17 वर्षांखालील मुलींच्या गटात परिणिता मगदूम, हर्षदा गावडे, संप्रती पाठराबे, अध्या विजू व देबांजली बाघची यांची निवड झाली. या सर्वांचे उपस्थितांनी अभिनंदन करून राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.