Breaking News

शालेय साहित्य खरेदीसाठी उरण बाजारात पालकांची लगबग

उरण : वार्ताहर

शाळा सुरू होण्यास अवघे थोडेच दिवस राहिल्याने  उरण  शहरातील बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची लगबग सुरू झाली आहे. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदीला सुरुवात झाली आहे. बच्चे कंपनीला आकर्षित करील, असे विविध प्रकारचे शालेय साहित्य सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यात शिवा, मोटू-पतलू, छोटा भीम, बार्बी, अंग्री बर्डस, बेन्तेन यांच्यासह स्पायडरमॅन, सुपर हीरोजचे चित्र असलेल्या स्कूल बॅग्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वह्या, पुस्तके, गणवेश, बूट, टाय, पेन, पेन्सिल, वॉटरबॉटल, छत्री, रेनकोटच्या खरेदीला देखील सुरुवात झाली आहे. 12 जूनपासून ही गर्दी आणखी वाढेल, असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. किमती आवाक्यात असल्याने बच्चे कंपनीकडून स्कूलबॅग, नोटबुक, कंपासपेटी यांच्या खरेदीसोबत वॉटरबॅग, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोटला अधिक मागणी आहे. स्कूल बॅग्जचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यात स्काय बॅग, सफारी, आर्टिक फॉक्स व सर्व प्रकारच्या ब्रॅन्डेड बॅगा, त्याचप्रमाणे स्टील वॉटरबॉटल, स्टील लंच बॉक्स, कंम्पास बॉक्स आदी बाजारात उपलब्ध आहेत, तसेच सर्व प्रकारच्या ब्रॅन्डेड छत्र्यांची मागणी  ग्राहक करीत आहेत, असे मंगल जनरल स्टोअर्सचे ताराचंद जैन यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply