Breaking News

‘रयत’च्या केंद्राचे आज खारघरमध्ये उद्घाटन

पनवेल : वार्ताहर

रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इक्युबेशनचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आणि चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, तर सन्माननीय अतिथी म्हणून जयश्रीताई चौगुले, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विश्वजीत कदम, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply