Breaking News

जनतेचे प्रश्न राज्य सरकारला दिसत नाही -आमदार प्रशांत ठाकूर

नागोठण्यात भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागोठणे ः रामप्रहर वृत्त
महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक जण स्वतःच्या पक्षाचा करता विचार करून आपले अस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचा प्रत्यय रायगडवासीयांना माणगाव येथील एका मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमातून  आला. एकीकडे सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे एकमेकांवर आरोप करायचे अशी परिस्थिती असल्याने सामान्य लोकांचे प्रश्न यांच्या सरकारला दिसत नाहीत. गेल्या दीड वर्षापासून मंत्रालयात आजाराने ग्रस्त असलेल्या राज्य सरकारला जनतेच्या समस्या कळणार कशा, अशी टीका भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केली.
नागोठणे येथे भारतीय जनता पक्ष रोहा मंडक अंतर्गत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (दि. 22) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
उद्घाटन समारंभास भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मपारा, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, अविनाश कोळी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, उपाध्यक्ष श्रेया कुंटे, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अशोक अहिरे, सोशल मीडिया संयोजक श्वेता ताडफळे,  कामगार आघाडी रोहा तालुका अध्यक्ष विलास डाके, विष्णू मोरे, मारुती शिंदे, शुभांश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता होती तेव्हा आपण समतोल साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. दुर्दैवाने राज्यातील समतोल आता हरवला आहे. त्यामुळे जनतेच्या इच्छेविरोधात लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यातून वेगवेगळी आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्यात जनतेविरुद्ध प्रकल्प लादल्याने जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. लोकांची लोकशाही मार्गाने सुरू असलेली आंदोलने चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्याच्या एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनात कशा पद्धतीने फुट पडेल याचे नवे नवे प्रयोग केले जात आहेत. वेळप्रसंगी त्यांना अडवले,  धमकावले जात आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक, शेतकर्‍यांसह अन्याग्रस्त घटनांना न्याय देण्यासाठी भाजपची आग्रही भूमिका राहील.
महाराष्ट्रात चक्रीवादळ ते कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचे विशेष योगदान दिलेले आहे. खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेला मोफत धान्य, गॅस, महिलांना अर्थिक मदत तसेच मोठ्या प्रमाणावर लसीचा साठा महाराष्ट्राला दिला. राज्यात जेव्हा चक्रीवादळ आले होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व विशेष पॅकेज दिले. त्यामुळे जनतेला न्याय कोणी दिला असेल तर तो भाजपने दिला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसून येते, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
नागोठण्यातील जनसंपर्क कार्यालयाद्वारे येथील लोकांसाठी भाजपने एक नवीन दालन खुले करून दिले असून त्याचा परिसरातील लोकांना निश्चितच फायदा होणार आहे. भाजपचे हे जनसंपर्क कार्यालय सर्वांसाठी आधार ठरेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.
आपचे प्रश्न सोडविण्याचे हक्काचे व्यासपीठ या कार्यालयामार्फत जनतेला मिळाले असल्याचे भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सांगितले, तर तरुण-बेरोजगारांना नोकरी व महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व अन्य नेत्यांनी मला सहकार्य करावे, अशी विनंती प्रास्ताविकेत रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर यांनी केली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून रोहा तालुका भाजपच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार तसेच पर्यावरण रक्षक पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply