पनवेल ः रामप्रहर वृत्त
कळंबोलीतील पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी सामाजिक विकास संस्थच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांच्या 294वी जयंती सोहळ्याचे रविवारी (दि. 7) आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये झाला.
कळंबोलीमधील सुधागड एज्युकेशन सोसायटीमध्ये राजमाता आहिल्यादेवी यांचा 294 वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ नेते प्रकाश शेंडगे, शेळी मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मोनिका महानवर, प्रियदर्शनी कोकरे, शिवसेना महानगरप्रमुख
रामदास शेवाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.