Breaking News

लाखोंची चोरी 10 दिवसांत उघड

कर्जत : बातमीदार

दहिवली येथील मार्केट यार्डमध्ये असलेल्या मानस एजन्सी या नावाचे होलसेल दुकानातील खायची बिस्कीट आणि रोख रक्कम अशी पावणे चार लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कर्जत पोलिसांनी यशस्वी तपास करताना अवघ्या 10 दिवसांत मुद्देमालासह चोरट्यांना ताब्यात घेतले.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कर्जत शहरात असलेल्या दहिवली भागात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड आहे. तेथे बाजार समितीने गाळे बांधले असून त्यापैकी एका गाळ्यात मानस एजन्सी हे घाऊक वस्तू विक्रीचे दुकान आहे. संदीप पाटील यांच्या या दुकानात 10 ऑगस्ट रोजी चोरी झाली होती आणि दुकान मालक पाटील यांनी 14 ऑगस्ट रोजी कर्जत पोलीस ठाण्यात बिस्किटे यांचे बॉक्स आणि खाण्याच्या वस्तूंची तसेच दुकानातील रोख रक्कम असा साधारण तीन लाख 70 हजाराचा ऐवज लंपास केला होता. त्या घटनेचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण भोर यांनी उपनिरीक्षक सचिन गावडे यांच्याकडे दिला होता. त्यानंतर अधिकारी गावडे यांनी आपले सहकारी कर्मचारी भूषण चौधरी यांनी तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरातील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचवेळी काही गुप्त खबरे आणि बातमीदार यांच्या माध्यमातून चोरट्यांचा सुगावा लागला होता. त्या माहितीच्या आधारे संदीप निगुडसे आणि गुरुदास पाटील या कर्जत शहरात राहणार्‍या दोघांचा शोध घेऊन चौकशी साठी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्या दोघांनी मानस एजन्सी मधून बिस्किटे बॉक्स आणि काही साहित्य तसेच रोख रक्कम लंपास केली असल्याचे मान्य केले.

पोलिसांनी सर्व माल हस्तगत करताना 3 लाख 70 हजाराचा ऐवज ताब्यात घेतला आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी देखील जमा केली आहे. कर्जत पोलिसांनी 150/2020 मध्ये दाखल झालेल्या भादंवी कलम  457, 380, 34 प्रमाणे दोन्ही आरोपी यांच्यावर घरफोडीचा गुन्हा नोंद केला आहे. 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी 10 दिवसात गुन्ह्याचा यशस्वी तपास केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply