Thursday , March 23 2023
Breaking News

कर्जतमध्ये एसटी कर्मचार्यांचा प्रमाणिकपणा

कडाव : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील पोटल येथील किसन बबन आगज  रविवार (दि. 7) सकाळी जांमरुंग-कर्जत एसटी बसने प्रवास करताना  त्यांच्या खिशातील पैशांचे पाकिट बसमध्येच पडले होते. एसटी बसचे वाहक दशरथ भोगरे व चालक ए. एस. गायकवाड या कर्मचार्‍यांना कर्जत आगारात बस गेल्यानंतर ते पाकीट आढळले. त्यांनी ते पाकिट बस स्थानकाच्या कार्यालयात जमा केले. दरम्यान, आगज यांना आपले पाकीट हरविल्याचे लक्षात येताच त्यांनी कर्जत बस स्थानकात चौकशी केली. त्यावेळी त्यांना आपले हरविलेले पाकीट बस स्थानकाच्या कार्यालयात वाहक व चालकाने जमा केल्याचे समजले. त्यांनी ते ताब्यात घेतले. एसटी कर्मचार्‍यांच्या  या प्रामाणिकपणाबद्दल किसन आगज यांच्यासह मंगेश आगज, ओमकार दळवी, योगेश आगज आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कर्जत बस स्थानकात जाऊन या वाहक आणि चालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बस स्थानक प्रमुख अधिकारी देवानंद मोरे, सहाय्यक वाहतूक निरिक्षक महादेव पालवे आणि अन्य कर्मचारी  उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply