Breaking News

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

तारा येथील भाजपचे नेतेे चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 8) विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. त्यानिमित्त तारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपनेते चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील तारा गावामध्ते जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटण्यात आलं. त्याचबरोबर वृक्षाचे महत्व पाहता गावामध्ये वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, माजी सरपंच विद्याधर जोशी, गणेश पाटील, दीपक पाटील, रोशन पाटील, संदीप पाटील, दिनेश पाटील, प्रशांत म्हात्रे, गजानन माळी, सुदर्शन पाटील, रामचंद्र पाटील, यांच्याहस शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply