Breaking News

मोक्याच्या क्षणी अपयशी ठरलो; रोहितची कबुली

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या पराभवानंतर रोहित शर्माने ट्विट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. मोक्याच्या क्षणी आम्ही अपयशी ठरलो. जेव्हा संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा होती, त्याच परीक्षेत आम्ही नापास झालो. केवळ 30 मिनिटांचा खराब खेळ आणि आमची विश्वचषक उंचावण्याची संधी गेली. तुम्ही सारे (चाहते) जितके दुःखी आहात, तितकाच मीदेखील आहे. भारताबाहेर स्पर्धा असूनही सार्‍या चाहत्यांचा उत्साह पाहून भारावून गेलो. इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार, असे ट्विट हिटमॅनने केले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply