उलवे : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टी पनवेल व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्था रायगडच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होतं. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना बुधवारी (दि. 24) प्रमाणपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पनवेल व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्था रायगडच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. याचा लाभ अनेक महिलांनी घेतला. त्याअंर्तगत उलवे नोड यथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुका सरचिटणीस प्रतिभा भोईर, कल्पना ठाकूर, गव्हाण सरपंच हेमलता भगत, वहाळ ग्रामपंचायत सदस्या मंजुळा कोळी, जयश्री कोळी, स्नेहलता ठाकूर, आशा पाटील, प्रिया शिंदे, संगीता कांबळे. निकिता शिंदे, सुजाता मुंबईकर, मदन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्यासह उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.