कर्जत : बातमीदार
तालुक्यात होत असलेल्या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पडाव्यात या अनुषंगाने कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड यांची रूट मार्च काढण्यात आला.
कर्जत तालुक्यातील दामत, पोशिर, साळोख तर्फे वरेडी, कोल्हारे, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, हुमगाव आदी नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि तेथील निवडणूका शांततेत पार पडाव्यात याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी घेरडीकर यांनी संबंधीत पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड यांना सोबत घेऊन नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोशिर, साळोख या गावात रूट मार्च काढण्यात आला. या वेळी येणार्या निवडणूकांसंदर्भात गावाचा आढावा घेण्यात आला. नेरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी नांनवरे, कर्मचारी भोईर, निलेश वाणी, केशव नागरगोजे, बरगडे, सुरेश बोडके, रमेश बोडके, पालवे, पंडू सूळ, कळंब चौकीच्या चव्हाण मॅडम, भालेराव, निरंजन दवणे यांच्यासह होमगार्ड रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.