पनवेलमध्ये होणार पाककला स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत पनवेलमध्ये शनिवारी (दि. 10) पाककला स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर पदार्थांचा समावेश असणार आहे. हे पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत, फक्त सादरीकरणाला महत्त्व दिले जाईल. तसेच सादरीकरणासाठी स्पर्धकांना वेळ देण्यात येणार आहे. या पाककला स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका शेजारी असणार्या अल्पसंख्यांक इंग्रजी स्कूल येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे. स्पर्धेमध्ये प्रवेश मोफत असणार असून फक्त 70 स्पर्धकांना नाव नोंदणी करून सहभाग घेता येणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी कोरोनाचे नियम व अटी लागू करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 7400119797 किंवा आयेशा याकुब रणदीवे 9967867980 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राजे प्रतिष्ठान भरणार गरीब कुटुंबांचे वीज बिल
पनवेल : जनतेची मूलभूत प्रश्न लक्षात घेऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत वरिष्ठांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून पनवेल परिसरातील अत्यंत गरीब अशा 70 कुटुंबाचे 500 रुपयांपर्यंत असलेले विजेचे बिल भरणार असल्याचे केवल महाडिक यांनी सांगितले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. ज्या गोर – गरीब नागरिकांचे विजेचे बिल 500 रुपये असेल अशा नागरिकांनी 9320646555, 740011979, 9987733987, 8169465203 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.