Breaking News

भाजपमध्ये वाढता ओघ

राष्ट्रवादी काँग्रेस, सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

देशाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सुधागड पाली येथील राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (दि. 9) येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णुभाई पाटील, राजेंद्र राऊत, राजेश मपारा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक अनुपम कुलकर्णी, अनुपम कुलकर्णी मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश जोनकर, प्रसाद लखमिले, अभिजित सावंत, सुनील भोनकर, स्वप्नील भुरे, वैभव मोहिते, वैभव जोशी, महेश खंडागळे, श्रीकांत शिंदे, मिलिंद थळे, अमोल चोगले, विश्वजित देशपांडे, अक्षय सरनाईक, गोरख माळी, किरण चव्हाण, नीलेश पवार, अखिलेश कुलकर्णी, रोशन भोजने, सुभाष जोशी, अविनाश परब, राजू शिंदे, विलास अंबिके, नितीन भौड, अनिल पोंक्षेकर, महेश जंगम यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह भाजपत प्रवेश केला.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply