खारघर : प्रतिनिधी : खारघर सेक्टर 35 मधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी येथील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. एकीकडे विशालकाय पर्वतरांगा, त्याचबरोबर शहरातील तलाव, विहिरी, लेक आदींचा समावेश आहे. या सर्व गोष्टीच्या संगोपनासाठी खारघर शहरातील अडोप्ट लेक, अडोप्ट ट्री या ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
वर्षभरात खारघर शहरातील सेक्टर 35 मधील लेकमध्ये स्वच्छता मोहीम, लेकच्या सभोवताली वृक्षारोपण आदी कार्यक्रम या ग्रुपने केले आहेत. मागील वर्षभरापासून लेक दत्तक घेऊन या ठिकाणी विविध कामे करण्यात आली. या उपक्रमाला वर्ष पूर्ण होत असल्याने रविवारी (दि. 12) इंटरनॅशल मदर्स डे निमित्ताने या ठिकाणी पुन्हा एकदा विविध उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे मदर नेचर म्हणून निसर्गाला संबोधित करत असताना या दिवशीच हे उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती या ग्रुपच्या सदस्या मनीषा लाभे यांनी दिली.