Breaking News

विविध विभागांकडून पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्तांना कोकण विभागाकडून मदत रवाना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोंकण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातून आज दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन पाठविण्यात आले. कोंकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कक्षाची पाहणी करून सामान रवाना केले.

पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून कोकण विभागीय मदत कक्ष अल्पबचत भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे सुरू करण्यात आला आणि अल्पावधीत जनतेने उत्स्फूर्त मदत दिली. नवी मुंबई आणि परिसरातील जनतेला मदत करावयाची असल्यास या मदत कक्षाचे  संबंधित अधिकारी आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत.

पुरवठा शाखेचे उपायुक्त शिवाजी कादबाने (9422015691) यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले (7020046461) आणि तहसीलदार, पनवेल अमित सानप (9833926509), निवासी तहसीलदार, संदीप चव्हाण (9987264497), सत्वशिला शिंदे, तहसीलदार (9969828954), नाथाजी सगट नायब तहसीलदार (8779545105) हे काम पाहणार आहेत. उपायुक्त महसूल सिद्धराम सालिमठ यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण कोकणातील परिस्थितीबदल कामकाज सुरू आहे.

पूरग्रस्त लोकांना आवश्यक असणारे साहित्य उदा. ब्लँकेटस्, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनेटरी नॅपकीन इ.), तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इ.), लहान मुले व मुलींसाठी किट असे पोषाख स्वीकारले जातील. जुने कपडे स्वीकारले जाणार नाहीत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वीकारल्या जातील, तसेच रोख स्वरूपातील निधी किंवा धनादेश खाली नमूद केलेल्या खात्यामध्ये संबंधित देणगीदारांना बँकेमार्फत जमा करता येईल.

मुख्यमंत्री सहायता निधी (मुख्य खाते) खाते क्रमांक 10972433751, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400001 शाखा कोड 003000 आयएफएससी कोड डइखछ0000300. तरी सदर पूरग्रस्तांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत करावी, असे आवाहन कोंकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी केले आहे.

या वेळी उपायुक्त महसूल सिद्धराम सालिमठ, उपायुक्त पुरवठा, शिवाजी कादबाने प्रांत अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप, तहसीलदार  संदीप चव्हाण, तहसीलदार सत्वशिला शिंदे, तहसीलदार प्रीतीलता कौरथी, तसेच महसूल आयुक्त कार्यालयातील आणि विभागीय कार्यालयातील विविध शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. दौंड यांनी रायगड जिल्ह्यातील पेण, महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील नुकसानीची पाहणी करून आढावा घेतला.

शासकीय अधिकार्‍यांची पूरग्रस्तांना मदत

पनवेल : बातमीदार

कोल्हापूर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. रविवारी (11 ऑगस्ट) मदतीसाठी गोळा केलेली सामग्री ट्रकद्वारे पनवेलमधून सांगली येथे रवाना करण्यात आली आहे. बेलापूर येथे अल्पबचत भवन उभारण्यात आले असून या ठिकाणी ज्यांना ज्यांना मदत द्यावयाची आहे त्यांनी सढळ हस्ते पूरग्रस्ताना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्था अगर व्यक्तिशः मदत करवायची असल्यास अधिक महितीसाठी पनवेल तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूरकडे पाठवण्यात आलेल्या सामग्रीमध्ये एक लाख पाण्याच्या बॉटल्स, पाच हजार सॅनेटरी नॅपकीन, सात हजार माऊथ मास्क, फरसाण-बिस्किटे, खाद्य, कपडे, सॅनिटरी नॅपकीन आदींसह विविध जीवनावश्यक वस्तूचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसांत या शासकीय अधिकार्‍यांनी सुमारे 10 लाखांची मदत गोळा करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे. सांगलीवरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता बंद असल्याने सुरुवातीला हे साहित्य सांगली येथे जाईल त्यानंतर मार्ग मोकळा झाल्यानंतर हे साहित्य कोल्हापूरकडे पाठविले जाणार आहे. रविवारी सकाळी हे साहित्य ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहे. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, तहसीलदार अमित सानप, बिडिओ धोंडू तेटगुरे, अभियंता संजय कटेकर, नायब तहसीलदार दत्ता आदमाने आदींसह महसूल, महानगर पालिका, पोलीस, परिवहन आदी विभागातील कर्मचारी व अधिकारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply