पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणार असल्याचे गौरोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आयटीआयच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरू होणार्या कौशल्य विकास केंद्रालाही महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.
पनवेल मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा एतिहासीक निर्णय सकरारने घेतला. आहे. त्यानुसार हा नामांतरण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी दि.14) झाला. असून त्यांच्या हस्ते नामांतरण फलाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अमरिश मोकल, कर्णा शेलार, मनिषा बहिरा, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय कुमार टीकोळे, वैभव वैशंपायन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुरुवातीलाच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले तसेच पुढे म्हणाले की, पनवेल आयटीआयला जिल्ह्यात प्रचंड मोठी मागणी आहे. त्यामुळे तीर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाची जोड मिळणार असल्याने आयटीआयच्या रुपांतराचा प्रवास खर्या अर्थाने सुरू होणार आहे. औद्योगिक शिक्षण क्षेत्रात हे नामांतरण महत्त्वपूर्ण पाऊल असून, या संस्थेच्या माध्यमातून नव्या पिढीला उत्कृष्ट औद्योगिक कौशल्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper