Breaking News

पंचांवर चिडचिडप्रकरणी महेंद्रसिंह धोनीला दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चेन्नई आणि राजस्थान संघांमधल्या सामन्याला सदोष पंचगिरीमुळे वादाचे गालबोट लागले. या वेळी ‘कॅप्टन कूल’ अशी ओळख असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ‘अँग्री’ रूप क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाले. दरम्यान, पंचांवर चिडचिड केल्याप्रकरणी धोनीला सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

सामन्याच्या अखेरच्या षटकात बेन स्टोक्सचा चौथा चेंडू मुख्य पंच गंधे यांनी ‘नो बॉल’ घोषित केला, पण स्क्वेअर लेग पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी मात्र तो ‘नो बॉल’ नसल्याचे सांगितले. याबाबत चेन्नईचे फलंदाज रवींद्र जडेजा आणि मिशेल सँटनर याने पंचांना विचारणा केली. त्या वेळी मैदानातच वाद सुरू झाला. तंबूत परतलेला चेन्नईचा कर्णधार धोनी हे सगळे पाहत होता. अखेर तो मैदानात घुसला आणि त्याने पंचांशी हुज्जत घातली.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply