Breaking News

शांताराम पवार यांची अध्यक्षपदी निवड

रोहा : तालुक्यातील गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम देवजी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच संदेश कापसे, गाव कमिटी अध्यक्ष राजेश शिर्के, पोलीस पाटील सुरेश जाधव, ग्रामसेवक शिद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीबद्दल शांताराम पवार यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

नागोठण्यात ‘ब्रम्हाकुमारीज’तर्फे वृक्षारोपण

नागोठणे : राजयोगिनी दादी प्रकाशमणिजींच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येथील ब्रम्हाकुमारीज सोशल अ‍ॅक्टिव्हिटी ग्रुपतर्फे भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात पॉलिटेक्निक कॉलेजच्या तनुजा मुक्कावार, नांदगावकर, स्थानिक सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. मंदादीदी, बी. के. पूनम दीदी, नागोठणेच्या उपसरपंच सुप्रिया महाडिक, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, कल्पना टेमकर, भक्ती जाधव यांच्यासह किशोर केदारी, अपर्णा जाधव, शोभा ताले, अश्विनी जाधव, लक्ष्मण भोईर, कारेकर, सानप, डॉ. सोमनाथ वडनेरे, चंदा, कोमल आदी सहभागी झाले होते.

रोटरी क्लबतर्फे स्वच्छता साहित्याचे वाटप

महाड : रोटरी क्लबचे माजी खजिनदार सचिन सुकाळे यांच्या सौजन्याने कोंझर (ता. महाड) येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना स्वच्छता कीटचे वाटप करण्यात आले. रोटरीचे सभासद सुधीर मांडवकर, रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त संजय मेहता, शिर्के सर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. रोटरीचे संतोष नगरकर, अभिषेक सुकाळे, सचिन सुकाळे आदी सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापक पाटील यांनी आभार मानले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply