Breaking News

वाकण-खोपोली मार्ग खड्डेमुक्तीसाठी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचा पुढाकार

पाली : प्रतिनिधी

वाकण-पाली-खोपोली राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम  सुरु आहे. त्यातच पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पाली पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले निरीक्षक बाळा कुंभार यांनी या मार्गावर स्वतः उभे राहून शक्य तेवढे खड्डे बुजवून घेतले.  वाकणपासून जंगलीपीर, बलाप, पाली ते थेट रासळ, पेडली, परळी, नाणोसे, तसेच पालीफाट्यापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली होती. गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची तकलादू डागडुजी करण्यात आली होती, मात्र मुसळधार पावसामध्ये पुन्हा या मार्गाची जैसे थे अवस्था झाली होती. पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी मार्गावरील शक्य तेवढे खड्डे बुजवून घेत आपल्या पोलीस सेवेतून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply