मुरूड : प्रतिनिधी
सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार या सुट्यांचा योग साधून पर्यटक येत आहेत. मात्र बदलत्या हवामानामुळे सध्या किल्ल्यावर जाणारी शिडाची बोट वाहतूक विस्कळीत झाली असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
1 सप्टेंबरपासून जंजिरा किल्ल्यावर जाणारी बोट वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र जोरदार पाऊस आणि वेगवान वारे यामुळे किल्ल्याच्या पायाथ्याशी बोट हेलकावे घेत असल्याने किल्ल्यात उतरण्यास अडचण होत आहे. परिणामी बहुतेक वेळा येथील बोट वाहतूक बंद ठेवण्यात येते.
वेगवान वार्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या होड्या ज्याप्रमाणे किनार्याला आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे जंजिरा किल्ल्यावर जाणार्या शिडांच्या होड्यासुद्धा किनार्याला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना जजिरा किल्ल्यापर्यंत पोचता येत नाही.
जंजिरा किल्ल्यावर जाणार्या शिडांच्या बोटीची वाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू झाली असली तरी हवामानात बदल झाल्याने 2 तारखेपासूनच ती वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. हवामान ठीक झाल्यानंतरच शिडांच्या बोटीची वाहतूक सुरळीत करण्यास परवानगी देण्यात येईल.
-यशोधन कुलकर्णी, सहाय्य्क बंदर निरीक्षक