Breaking News

भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

स्मृती शशिकांत पै यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

कडाव : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शुक्रवारी (दि. 13) भाजपच्या स्मृती शशिकांत पै यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैशाली विलास नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात अध्याशी अधिकारी अरुण बळीराम विशे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली होती. विहित मुदतीत सरपंचपदासाठी स्मृती पै यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने अध्याशी अधिकारी विशे यांनी स्मृती पै यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत, तालुका उपाध्यक्ष गौतम मुंढे, कर्जत शहर उपाध्यक्ष प्रकाश पालकर, शहर सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सुगंधा भोसले, तालुका चिटणीस प्रतिभा बारणे, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे, सोशल मीडिया सेल जिल्हा सहसंयोजक विलास श्रीखंडे, पाथरज जिल्हा परिषद गण अध्यक्ष महेश घाडगे, शशिकांत पै, पोलीस पाटील बबन बार्शी आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित सरपंच स्मृती पै यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply