नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 26 फेब्रुवारी रोजी असलेली पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा जागतिक मराठी गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीनही दिवस सीकेटी इंग्रजी माध्यमात एकत्रितपणे साजरे करण्यात आले. या प्रसंगी पनवेल कल्परल असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योत्स्ना देऊस्कर यांना प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातील सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया ताह्मनकर यांनी या तिनही दिवसांची माहिती देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी भाषा शुद्धीकरण चळवळ आणि त्यांनी मराठी भाषेला दिलेले नवीन शब्द या विषयी सांगताना सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टीकोन विषद केला. मराठी विभाग प्रमुख प्रकाश पांढरे यांनी मराठी भाषेची गोडी सांगताना मराठीतील संत आणि साहित्यिक यांचे योगदान या विषयी माहिती दिली. पर्यवेक्षिका नीरजा मॅडम यांनी प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगत इतरही भाषांवर प्रभुत्व मिळवले पाहिजे हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख पाहुण्या सौ. ज्योत्स्ना देऊस्कर यांनी हे तिनही दिवस एकत्रितपणे साजरे करण्याच्या अभिनव संकल्पने बद्दल शाळा प्रशासनाचे कौतुक केले तसेच विद्यर्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या प्रसंगी स्वातंयवीर सावरकर, मराठी दिन आणि विज्ञान दिन या विषयी भाषणे केली. तसेच ग. दि. माडगुळकर आणि पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन माडगुळकरांच्या काही कविता सादर केल्या. मराठी दिन यांचे महत्त्व सांगणारी एक नाटिका सादर केली. विद्यार्थ्यांना स्वातंयवीर सावरकरांच्या अतुलनीय कार्याची जाणीव व्हावी तसेच भाषेची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा अशा उद्देशाने हे तीनही दिन आम्ही एकत्रितपणे साजरे केले. असे या प्रसंगी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सांगितले. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका प्रगती जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते.