Breaking News

वैद्यकीय महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धा; खेळाच्या विविध प्रकारांचा समावेश

अलिबाग : प्रतिनिधी

कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग येथील चं. ह. केळुसकर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या वतीने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्राचार्य  डॉ. आर. जे. जैन यांच्या उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून उद्घाटन झाले. या वेळी पर्यावरणाचा र्‍हास कमी व्हावा यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत जनजागृतीपर फेरी काढण्यात आली 4 ते 7 मार्चपर्यंत चालणार्‍या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, कॅरम, बॅटमिंटन, धावणे, रस्सीखेच, टेबल टेनिस आदी विविध खेळांचा समावेश आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास स्टुडंट कौन्सिलचे व्हाईस चेअरमन डॉ. आशिष भगत, डॉ. आनंद नाईक, डॉ. नम्रता ठाकूर, डॉ. आरती गंभीर, डॉ. अदिती साष्टे, डॉ. कविसा पाटील, डॉ. राखी जोशी, स्टुडंट कौन्सिलचे जीएस ओमकार नाईक, एलआर निधा कादरी, स्पोर्ट्स सेक्रेटरी संकेत मोरे, सोनल पाटील, कुमार ठाकूर, सुधीर गायकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply