Breaking News

मराठी भाषेत संवाद साधताना इंग्रजीचा वापर -भुंजे

पनवेल : प्रतिनिधी 

 मराठी भाषेत संवाद साधताना आजकाल सर्रासपणे इंग्रजीचा वापर होत असल्याची खंत दिलीप भुंजे यांनी पनवेल येथील के.गो. लिमये  सार्वजनिक वाचनालयात  गुरुवारी  मराठी भाषा गौरव दिनी व्यक्त केली. पनवेल येथील के.गो. लिमये  सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे दिलीप भुंजे यांचे हस्ते कवि कुसुमग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी गझलकार  ए.के. शेख , कार्यवाह  विनायक वत्सराज, सचिव काशीनाथ जाधव ,प्रशांत राजे, आणि सह कार्यवाह जयश्री शेट्ये उपस्थित होते. यावेळी  दिलीप भुंजे यांनी  कुसुमग्रजांच्या मराठीतील कविता आणि नाटकांची माहिती देऊन नटसम्राट या नाटकातील लिखाणातून त्यांच्यातील कवि आणि नाटकार कसं दिसतो हे स्पष्ट केले. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यातील भारतरत्न  पुरस्कार असल्याचे सांगितले. यावेळी गझलकार ए.के. शेख यांची शासनाने मराठी साहित्य मंडळाचे सदस्य म्हणून नेमणूक केल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी हा घरचा सत्कार म्हणजे आईची पाठीवर पडलेली थाप असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कुसुमग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यावेळी नाशिकला त्यांना भेटायला गेल्याची आठवण सांगितली. मराठी भाषेतील प्रत्येक शब्द म्हणजे एक मंत्र असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले   यावेळी सचिव  काशीनाथ जाधव यांनी आपल्या प्रस्ताविक केले  तर विनायक वाटसराज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला  सह कार्यवाह जयश्री शेट्ये  यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत राजे यांनी केले .

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply