Breaking News

पनवेलमध्ये दहावी परीक्षेला शांततेत प्रारंभ,12 हजार परीक्षार्थी

पनवेल : बातमीदार

दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (ता. 1) पासून पनवेलमध्ये प्रारंभ झाला  पनवेल तालुक्यात दहावीची 17 परीक्षा केंद्र असून, एकूण 12 हजार 344 परीक्षार्थी आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने या परीक्षेसाठी पनवेल तालुक्याचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागाचे मुख्यालय पनवेल असून दुसर्या विभागाचे मुख्यालय कळंबोली आहे. पनवेल विभागात व्ही. के. हायस्कूल, बांठिया विद्यालय, केव्ही शाळा, सीकेटी नवीन पनवेल, छत्रपती विद्यालय-गव्हाण, जनता विद्यालय-मोहोपाडा, सार्वजनिक विद्यामंदिर-साई, बार्न्स स्कूलअशी आठ परीक्षा केंद्र असून या केंद्रात एकूण 6 हजार 567 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. तर कळंबोली विभागात महात्मा स्कूल, प. जो. म्हात्रे विद्यालय नावडे, छत्रपती शिवाजी विद्यालय रोहिंजण, सुधागड एज्युकेशन सोसायटी विद्यालय कळंबोली, जोसेफ स्कूल, गोखले एज्युकेशन सोसायटी-खारघर, सु.ए.सो. माध्यमिक विद्यालय कोपरा, न्यू इंग्लिश स्कूल-कामोठे, सुषमा पाटील विद्यालय कामोठे अशा नऊ परीक्षा केंद्रांचा समावेश असून या केंद्रात 5 हजार 777 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. दहावीच्या परिक्षा 1 मार्च 2019 पासून सुरु सुरु झालेल्या  असून 22 मार्च पर्यंत असणार असल्याचे जाहीर केले आहे.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply