Breaking News

पेण तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सव

पेण : प्रतिनिधी

 तालुक्यात सार्वजनिक तसेच घरगुती साखरचौथ गणपतींची मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र मंगलमय वातारवण निर्माण झाले आहे.

अष्टविनायक मित्र मंडळ, ओरिजनल अष्टविनायक मित्र मंडळ, प्रेमनगर मित्र मंडळ-चिंचपाडा, सुंदरनगर मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ-देवआळी, श्री गणेश उत्सव मंडळ-कोळीवाडा, महाकाली मित्र मंडळ-कासारआळी, शिक्षक सोसायटी मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ-दामुगुडे आळी, ओम श्री मित्र मंडळ-विठ्ठल आळी, समृद्धीचा राजा-पेण, अंबामाता मित्र मंडळ-समर्थनगर रामवाडी, विश्वराज मित्र मंडळ, न्यू यंग गणेश मंडळ-पिंपळपाडा, जय गणेश मित्र मंडळ-बोरगाव, श्री शिवसमर्थ मित्र मंडळ -आंबेघर, अष्टविनायक मित्र मंडळ -गणपतीची वाडी, यंग स्टार मित्र मंडळ-रामवाडी, साखरचौथ ग्रामस्थ मंडळ-इरवाडी आदी सार्वजनिक मंडळांसह घरगुती साखरचौथ गणपतींची पेण तालुक्यात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र भव्य मंडप उभारण्यात आले असून, विद्युत रोषणाईसह मनमोहक सजावटही करण्यात आली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची सर्वत्र रीघ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे चित्रही परिसरात दिसून येत आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply