Breaking News

नांदगाव हायस्कूल येथे पंचक्रोशीचा राजा विराजमान

मुरूड : प्रतिनिधी

नांदगाव हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 17) साखरचौथ गणपती ‘पंचक्रोशीचा राजा‘ विराजमान झाला. फटाक्यांच्या आतषबाजीत व बेंजोच्या तालावर पंचक्रोशीचा राजाचे आगमन झाले. त्याच्या पूजेचा मान अशोक दहिगावकर व त्यांच्या पत्नी लता यांना मिळाला. शैलेश जोशी यांनी पौरोहित्य केले.

 या वेळी सजावटीद्वारे चांद्रयान मोहिमेची माहिती मुलांना देण्यात आली आहे. या सजावटीमध्ये जीएसएलव्ही 3 आणि प्रग्यान रोव्हरची प्रतिकृती दाखविण्यात आली आहे. सदरचा देखावा व सजावट प्रतीक पेडणेकर, विजय बनाटे व अमर दरने यांनी केली आहे. सहजीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष फैरोज घलटे,  मुख्याध्यापक चिंतामणी जोशी, पर्यवेक्षक उत्तमराव वाघमोडे यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शाळेचे माजी विद्यार्थी योगेंद्र गोयजी, केदार गद्रे, निलेश बिरवाडकर, दीपक फळेभाई, गोपीचंद बाजी यांनी आठ वर्गखोल्यांकरिता पंखे भेट दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply