Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करंजाडेतील बसथांब्याचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने करंजाडे येथे उभारण्यात आलेल्या बसथांब्याचे लोकार्पण भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते युवा नेते मंगेश शेलार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 16) झाले. या वेळी उपस्थितांनी शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
करंजाडेमधील नागरिकांसाठी सेक्टर 3 येथे श्री सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने बसथांबा उभारण्यात आला आहे. या बसथांब्याच्या लोकार्पण कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते कर्णा शेलार, वासुदेव पाटील, वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, तानाजी शेलार, शिवाजी शेलार, जगदिश धुमाळ, निनाद मुंबईकर, गणेश कदम, विनोद शिरवी आदी उपस्थित होते. या वेळी मंगेश शेलार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply