Breaking News

‘भारत श्री’ विजू पेणकरांच्या चरित्राचे 29 नोव्हेंबरला प्रकाशन

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता या प्रकाशन सोहळ्याचे माझगाव येथील सर एली कदुरी शालेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. सदामंगल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. डोंगरी-उमरखाडीच्या मातीत कबड्डीचे हुंकार घुमवत असतानाचा शरीरसौष्ठव खेळातही विजू पेणकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply