पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन रविवारी (22 सप्टेंबर) सकाळी 11 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यास सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन, ओमप्रकाश कानुनगो, लक्ष्मीनिवास जाजू, संजय खेमानी, दिनेश गुप्ता, प्रांत अध्यक्ष शरद माडिवले, सचिव महेश शर्मा, गगन पांडे, खजिनदार भीमजीभाई रूपानी, पनवेल अध्यक्ष गणेश समुद्रा, सचिव दीपक जांबेकर, खजिनदार नितीन कानिटकर आदी उपस्थित राहणार आहेत.