चौक : रामप्रहर वृत्त
जेएनपीटी विश्वस्त तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कामगार पक्षाच्या जवळपास 50 कार्यकर्त्यांनी धडाडीचे युवा नेते अमोल मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. चौक येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
सबका साथ सबका विकास या न्यायाने कार्यरत असणार्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक दाखल होत असल्याचे चित्र आहे.