Breaking News

उरणमध्येही शेकापची पडझड; कांब्यातील कार्यकर्ते भाजपमध्ये

उरण : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील चांभार्ली ग्रामपंचायतीचे शेकाप सदस्य सचित कुरंगळे आणि कांबे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी

(दि. 24) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे कांबे गावात शेकापला खिंडार पडले आहे.

उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप नेते महेश बालदी नेटाने कार्यरत आहेत. आमदार नसतानाही त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. म्हणूनच त्यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद

लाभत आहे. बालदी हे आमदार झाल्यानंतर उरण मतदारसंघात विकासाची गंगा येणार आहे. त्यामुळे विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. उरण येथे झालेल्या कार्यक्रमात चांभार्ली ग्रामपंचायतीचे सदस्य सचित शरद कुरंगळे, ज्ञानेश्वर गोपाळ कुरंगळे, प्रितेश दिनकर कुरंगळे, महेंद्र गोपीनाथ कुरंगळे, हरिभाऊ शालिकराम शितकंदे, दत्तात्रेय गोविंद कुरंगळे, भाऊ रघुनाथ कुरंगळे, धनाजी गोपीनाथ कुरंगळे, सुजित शरद कुरंगळे, दिलीप रघुनाथ कुरंगळे, बाळकृष्ण जगन्नाथ कुरंगळे, प्रसाद चंद्रकांत कुरंगळे, विद्देश अर्जुन कुरंगळे, महेश हरिभाऊ गोंधळी, समीर मधुकर डुकरे, विक्रांत तुकाराम कुरंगळे, गणेश मुकुंद शितकंदे, तुकाराम गोपाळ कुरंगळे, कुणाल अशोक कुरंगळे, आनंद कुरंगळे, रमण गोविंद कुरंगळे, रोहन कुरंगळे, प्रवीण गणेश कुरंगळे, भरत लडकू कुरंगळे आदी कांबे येथील शेकाप कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला. चांभार्ली ग्रामपंचायतीचे सदस्य प्रवीण जांभळे, ज्ञानेश्वर मुंढे, भूषण पारंगे व प्रमोद जांभळे यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply