Breaking News

धावत्या ट्रेनमधून गर्भवती पत्नीला ढकलले; सुदैवाने प्राण बचावले

मुंबई : प्रतिनिधी

रेल्वे प्रवासात वादावादी झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. मुंबईतील दहिसर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. सागर धोडी (25) असे आरोपीचे नाव आहे. सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपार्‍याला जात असताना त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. रागाच्या भरात सागरने राणीला ट्रेनमधून बाहेर ढकलले. सुदैवाने या वेळी ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे राणीचे प्राण बचावले. सागरला मूल नको होते. त्यावरुन तो सतत माझ्याबरोबर भांडण करायचा, असे राणीने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर सागर फरार झाला आहे. सागरविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सागरचा हा दुसरा विवाह असून पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुले आहेत. सागरचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचे समजल्यानंतर त्याची पहिली पत्नी मुलांना घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर 1 नोव्हेंबरला सागरने राणीबरोबर दुसरे लग्न केले. राणीने लग्न केले त्यावेळी ती सहा महिन्यांची गर्भवती होती. सागरला राणीपासून मूल

नको होते. सततच्या भांडणाला कंटाळून राणी तिच्या नातेवाइकांकडे निघून गेली, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. सागर 15 नोव्हेंबरला तिला भेटायला गेला व त्याच्यासोबत मित्राकडे येण्यास सांगितले. राणी तयार झाली. त्यांनी बोरिवलीहून विरार लोकल पकडली. राणी आणि सागर दरवाजाजवळ उभे असताना त्यांच्यात भांडण सुरु होते. ट्रेनने दहिसर सोडल्यानंतर सागरने तिच्या छातीत बुक्का मारला व तिला बाहेर ढकलून दिले. राणीच्या पायांना, उजव्या हाताला आणि डोळ्यांना मार लागला. स्टेशन मास्तरने

जीआरपीला याची माहिती दिल्यानंतर राणीला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पोटातील बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले. राणीची प्रकृती आता सुधारत असून ती तिच्या आईकडे आहे. पोलीस सागर धोडीचा शोध घेत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply