Breaking News

सातार्‍याची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच!

सातारा : प्रतिनिधी

उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खासदारपदासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरलाच सातार्‍यात मतदान होणार आहे.

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातार्‍याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपत गेल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेसोबत सातार्‍याची पोटनिवडणूक होणार, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात होता, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना सातार्‍याबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे सातार्‍याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी

(दि. 24) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्याच्या विधानसभेसोबतच 21 ऑक्टोबरला सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून, मतमोजणी 24 ऑक्टोबरला विधानसभा मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे पोटनिवडणुकीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सातारा पोटनिवडणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायालयाचे आदेश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळाले. त्यानंतर मंगळवारी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची आयोगाने घोषणा केली.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply