पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त आणि पोषण दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील एस. के. यांनी प्रास्ताविक करून महात्मा गांधींच्या अहिंसा आणि असहकार या मूलतत्त्वाची माहिती दिली. स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. आर. गावंड यांनी केले. या वेळी सहाय्य्क शिक्षक एस. डी. पाटील आणि व्ही. जी. पाटील यांनी गांधीजींचे जीवनकार्य आणि प्लास्टिकमुक्त भारत या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. आकांक्षा रणवीर, साक्षी सावंत, आदित्य खंदारे आदी विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियान या विषयावर आपले विचार व्यक्त करून महात्मा गांधींना अभिवादन केले. अध्यक्ष शरद खारकर यांनी महात्मा गांधींना आपल्या मनोगतातून अभिवादन केले.