Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत खारघरमध्ये पक्षप्रवेश

खारघर : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्याअंतर्गत खारघर विभागातील शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. हा सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (दि. 1) झाला.

खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या पक्षप्रवेशात माजी सरपंच मंजुळा म्हात्रे, माजी उपसरपंच सोमनाथ म्हात्रे, माजी सदस्या सीमा खडकर, रमेश खडकर, नामदेव म्हात्रे, नवतरुण उत्सव मंडळाचे पदाधिकारी, बिईंग द रियल ह्युमन फाऊंडेशनचे पदाधिकारी, नवी मुंबई रिक्षा महासंघ अध्यक्ष कासम मुलाणी, ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघ खारघरचे पदाधिकारी, तसेच श्रीदत्त गगनगिरी भक्त मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, आरपीआय अध्यक्ष जगदीश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नीलेश बावीस्कर, रामजी बेरा, नरेश ठाकूर, नगरसेविका कुसूम म्हात्रे, आरती नवघरे, भाजप नेते विजय पाटील, दत्ता वर्तेकर, दीपक शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply